Gharkul Yadi 2024 Maharashtra | या जिल्ह्यातील 3522 वैयक्तिक घरकुलांसाठी रु. 47 कोटी निधी मंजूर ; घरकुल यादी पहा

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
76 / 100

Gharkul Yadi 2024 Maharashtra

Gharkul Yadi 2024 Maharashtra

Gharkul Yadi 2024 Maharashtra :- नमस्कार मित्रहो, आपल्या पैकी बरेच व्यक्ती घरकुल मिळण्यासाठी घरकुल योजनेमध्ये अर्ज करतात व आपण नियम व अटी पूर्ण करत असू तर आपल्याला घरकुल योजनेचा लाभ पण मिळतो. मित्रहो आपल्यापैकी जर कोणी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे ती आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत. 

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवगातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंअंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. 2 ते 4 मधील तरतुदींनुसार जिल्हाधीकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, चंद्रपुर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20.06.2024 रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने दिनांक 24.06.2024 रोजीच्या अदेशान्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या चंद्रपुर जिल्यातील 3522 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.6 येथील पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

Gharkul Yadi 2024 Maharashtra

सदरहू प्रस्तावाच्या अनुषंगाने, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंअंतर्गत सन 2024-25 करीता चंद्रपुर जिल्यातील खालील  दर्शवल्याप्रमाणे 3522 वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरीता प्रती लाभार्थी रु.1.30 लक्ष प्रमाणे रु.45,78,60,000 /-(अक्षरी रुपये पंचेचाळीस कोटी अठ्याहत्तर लक्ष साठ हजार फक्त) व 4 टक्के प्रशासकीय निधी (प्रती घरकुल रु.5200/- प्रमाणे) रु.1,83,14,400/- (अक्षरी रुपये एक कोटी त्र्याऐंशी लक्ष चौदा हजार चारशे फक्त) असा एकूण रु.47,61,74,400/- (अक्षरी रुपये सत्तेचाळीस कोटी एकसष्ट्ट लक्ष चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपये फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

सदरहू निधीपैकी तूर्त रु.9,52,00,000/- (अक्षरी रुपये नउ कोटी बावन्न लक्ष फक्त) आतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेंअंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल. 

तालुकानुसार लाभार्थी संख्या :- 

1. बलारपूर (सन 2023-24) – 29 

2. ब्रह्मपुरी (सन 2023-24) – 262 

3. ब्रह्मपुरी (सन 2024-25)- 200 

4. सावली (सन 2024-25) – 2365 

5. सिदेवाही (सन 2023-24) – 666 

अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहाइथे क्लिक करा 

👉Farmer Loan Waiver 2024 | ब्रेकिंग न्यूज ; राज्यातील शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता !

Leave a Comment