Indian Meteorological Department
Indian Meteorological Department :- नमस्कार मित्रहो, राज्यात गेल्या 3 ते 4 दिवसांत बहुतांश जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला असून पुरपरिस्तिथीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या मते राज्यात पुढील काही दिवस पावसाचं वातावरण राहणार असून विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
यामध्ये दिनांक 22 जुलै 2024 रोजी कोकणासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सोबतच पालघर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला.
Indian Meteorological Department
नागपूर, मुंबई, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी मध्यम पावसाचा इशारा दिलेला आहे.
दिनांक 23 जुलै 2024 रोजी रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात येऊन अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
सोबतच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यासोबतच पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात सुद्धा हलका ते मध्यम पावसाचा इशारा दिलेला आहे. मराठवाडा विभागात हवामान खात्याने पावसाचा कुठलाही इशारा दिलेला नाही.
दिनांक 24 जुलै 2024 रोजी कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे, सोबतच पूर्वविदर्भात वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.