Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana | मोठा निर्णय ! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा शासन निर्णय GR आला

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana :- नमस्कार शेतकरी मित्रहो, जागतिक हवामान बदल आणि अनियमीत पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.

राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरीता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे. सदर परिस्तिथी लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 एच.पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे.

मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी पावसाळी अधिवेशन 2024 मधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्र.100 अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची
गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी “मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना” मी आता घोषीत करीत आहे.

याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीजबिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरविले असून राज्यातील ४४ लाख 3 हजार शेतकऱ्यांच्या ७.५ अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरिता १४ हजार ७६0 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana

शासन निर्णय :-

भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 एच.पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना-2024” राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. 

योजनेचा कालावधी :-

सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेवून पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

पात्रता :-

राज्यातील 7.5 एच.पी पर्यंतच्या शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.

अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा इथे क्लिक करा

Leave a Comment