Weather Update For Maharshtra | राज्यात पावसाचा जोर वाढणार ! हवामान विभागाचा नवीन अंदाज काय सांगतोय ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
80 / 100

Weather Update For Maharshtra

Weather Update For Maharshtra

Weather Update For Maharshtra :- नमस्कार मित्रहो, राज्यात हप्ताभरापासून मुसळधार पाऊस कोसळतोय, या होत असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळत आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात अजूनही पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता असून संबंधित जिल्ह्यांना अलर्ट सुद्धा देण्यात आले आहे. 

Weather Update For Maharshtra

विदर्भ व कोकण विभागात पुढील 4 ते 5 दिवस पाऊस राहणार असून दिनांक 26 जुलै 2024 रोजी रायगड, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

दिनांक 27 जुलै 2024 रोजी चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सोबतच नागपूर, भंडारा, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा दिला आहे. 

👉Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana | मोठा निर्णय ! मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा शासन निर्णय GR आला

Leave a Comment