PM Kisan Scheme Update
PM Kisan Scheme Update :- नमस्कार शेतकरी मित्रहो, पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नियमावलीत बदल केला असून नवी नियमावली लागू केली आहे. त्यासंदर्भात आजच्या या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.
सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनीअर, पेन्सनर, आयकर भरणारे लाभार्थी कायमस्वरूपी वगळण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाख 59 हजार 670 लाभार्थींंना विविध कारणाने पीएम किसान पोर्टलवर करण्यात आले आहे. अपात्र लाभार्थी वर्गवारीनिहाय पडताळणी करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात तालुकास्तरावर मोहीम स्वरूपात चालू आहे.
PM Kisan Scheme Update
जे शेतकरी पात्र असूनही त्यांचे नाव अपात्र यादीत समाविष्ट आहे. अश्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातील कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून पात्रतेसाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता तात्काळ करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
अपात्रता निकष :-
- एकाच कुटुंबातील लाभार्थी (पती-पत्नी 18 वर्षाखालील अपत्य वगळून)
- राज्याचा रहिवासी नसलेले लाभार्थी
- संविधानिक पदावरील व्यक्ती
- माझी संविधानिक पदावरील व्यक्ती
- केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था निमशासकीय कर्मचारी
- जमीन विक्रीमुळे भूमिहीन लाभार्थी
- संस्था मालकी असलेल्या जमीनधारक
- नोंदणीकृत व्यावसायिक
- सलग 3 वर्ष आयकर भरणारे लाभार्थी
- स्वतालाभ समर्पित केलेले लाभार्थी
- सेवानिवृत्तीधारक लाभार्थी
- जमिनीची मालकी स्वतानावे नसलेले लाभार्थी
- दुबार नोंदणी असलेले
- शेती शिवाय इतर कारणासाठी वापरणारे जमीनधारक
- अनिवासी भारतीय
- खोट्या महितीद्वारे नोंदणी केलेले लाभार्थी स्त्रोत – आग्रोवन