Ladki Bahin Yojana FIR Update | धक्कादायक ! या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल ; आपल्यावर गुन्हा दाखल झाला का ? एकदा पहा.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100 SEO Score

Ladki Bahin Yojana FIR Update

Ladki Bahin Yojana FIR Update

Ladki Bahin Yojana FIR Update :- नमस्कार, लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल झाले या संदर्भात माहिती समोर येते आहेत तर काय प्रकरण ते आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै २०२४ मध्ये महिलांसाठी सुरू केलेली एक योजना आहे. लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली होती.

या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना ₹ १,५००/- असा आर्थिक लाभ देण्यात येतो. १,५०० रूपया ऐवजी आता लवकरच २,१०० रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना लाभ मिळण्याची शक्यता आहे. 

Ladki Bahin Yojana FIR Update

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या काही महिलांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याचं समोर येते आहे त्यासंदर्भात अधिक माहिती अदिती तटकरे मंत्री, महिला व बालकल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेली असून ती माहिती खालीलप्रमाणे आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार सुरू होता व तो स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत ४ ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मंत्रीमहोदयांनी दिली आहे. 

लाडकी बहीण योजनेची पात्रता काय ?

  • महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹ २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

✅PM Kisan 19th Installment Date | खुशखबर ! पीएम किसानच्या 19 व्यां हप्त्याची तारीख झाली फिक्स ; केंद्रीय कृषि मंत्र्यांची घोषणा

Leave a Comment