Namo Shetkari Yojana 6th Installment Date
Namo Shetkari Yojana 6th Installment Date :- नमस्कार मित्रांनो, राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000/- जमा होण्यास सुरुवात झाली असून काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून योजनेचे पैसे जमा व्हायचे आहे.
राज्यातील बहुतांश शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6 व्यां हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. अश्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की गुडीपाडव्याच्या आधी योजनेचे पैसे जमा होणार आहे.
Namo Shetkari Yojana 6th Installment Date
शेतकरी बंधूंनो हे पैसे “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे” असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 19 वां हप्ता आला असेल अश्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा 6 वां हप्ता जमा होणार आहे.
याबद्दलची अधिक माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया द्वारे दिली असून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने‘च्या 6 व्या हप्त्यांतर्गत उद्यापासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत ₹2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे.
यादी इथे पहा :- क्लिक करा