Havaman Andaj Today
Havaman Andaj Today :- नमस्कार मित्रांनो, राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट सक्रिय असून तापमानाचा पारा वाढलेला आहे, यासोबतच राज्यात काही ठिकाणी दुपारनंतर वादळी पाऊस सुद्धा होताना बघावयास मिळतो आहे.
आज दिनांक 4 मे 2025 दुपारनंतर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस पाहायला मिळाला असून त्यासंदर्भात हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता, आता हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिट होण्याचा धोका वर्तविला आहे.
हवामा विभागाच्या अंदाजानुसार दिनांक 5 मे 2025 रोजी विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसाचा धोका असून यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Havaman Andaj Today
यासोबतच अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, पालघर, ठाणे, पुणे, सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
दिनांक 6 मे 2025 रोजी पावसाची व्याप्ती वाढणार असून गारपीटीचा धोका आहे, यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व जिल्ह्याचा घाट परिसर या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याची शक्यता आहे.
भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Your blog has quickly become one of my favorites. Your writing is both insightful and thought-provoking, and I always come away from your posts feeling inspired. Keep up the phenomenal work!