ऑगस्टमध्ये राज्यात पावसामद्धे खंड पडणार का ? भारतीय हवामान खात्याचा अंदाज | IMD Forecast For Maharashtra
IMD Alert :-
जून महिना जवळपास कोरडा गेला त्यामुळे खरीपातील बऱ्याच पेरण्या खोळंबल्या.तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने ओढ दिली त्यामुळे खरीपातील लागवड केलेली पिके धोक्यात आली होती.
पण जुलै च्या दुसऱ्या पंढरवाड्यात मान्सूनला पोषक वातावरण तयार होऊन राज्यात मुसळधार स्वरूपाचा झालेला आहे. राज्यातील खासकरून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे.
पण मराठवाड्यातील काही ठिकाणी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही आहे. मात्र गेल्या काही दिवसात राज्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे खरीपातील काही पिकांचे नुकसान झाले आहे.
या अतिमुसळधार पावसामुळे राज्यात विविध जिल्ह्यात पुरपरिस्थिति बघायला मिळत आहे, सोबतच नदीकाठील गावात, शहरात पानी घुसले आहे, तर नदीकाठावरच्या शेतीमधील पिके पाण्यात बुडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र :-
यावर्षी जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात पाऊस जास्त प्रमाणात झालेला आहे. बहुतांश ठिकाणी जुलै मधील पावसाने सरासरी ओलांडली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यात पावसासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात काही दिवस पाऊस थांबणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या अंदाजानुसार पुढील 2 आठवडे पाऊस कमी राहणार आहे.
त्यामुळे ज्या भागात पाऊस कमी झालेला आहे तेथील शेतकऱ्यांची चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. पण काही ठिकाणी गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पाऊसामुळे तेथील शेतकऱ्यांना पिकांची मशागत करता येत नव्हती त्यामुळे या पावसाच्या विश्रांतीचा तेथील शेतकऱ्यांना फायदा होईल.