![Rain-Alert](https://marathi24taas.in/wp-content/uploads/2023/08/Rain-Alert-300x150.png)
Rain Alert | पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधार तर कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस
Havaman Andaj :- राज्यात जुलै महिन्याच्या शेवटी पावसाने उघाड दिलेली बघायला मिळाली आहे. तर आता राज्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात आज 3 ऑगस्ट रोजी बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागामध्ये जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
सध्या कुठे आहे कमी दाब ?
बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यामार्गे प्रवास करत छत्तीसगड राज्यात आले आहे. सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्रबिंदू छत्तीसगड मधील अंबिकापुर च्या उत्तर-ईशान्येस सुमारे 40 की. मी. अंतरावर आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 12 तासात कमी दाबाचे क्षेत्र प्रवास करत ते पश्चिम-वायव्य दिशेने मध्यप्रदेश कडे व आग्नेय उत्तर प्रदेशकडे मार्गक्रमण करणार आहे.
पुढील काही तासात या जिल्ह्यात मुसळधार:-
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याच्या अंदाज व्यक्त केला आहे. सोबतच यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना एलो अलर्ट देऊन पुढील काही तासात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
आज कुठे होणार पाऊस ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र व कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.