LPG Accident Claim | घरी वापरत असलेल्या गॅस सिलेंडर मुळे अपघात झाल्यास आता मिळते 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई
आजच्या आधुनिक काळात प्रतेकाच्या घरी एल पी जी गॅस असतो. आणि आता केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजणेमुळे खेड्यापाड्यात प्रतेकाच्या घरात एलपीजी गॅस पोहोचला आहे.
एलपीजी गॅस सिलेंडर ज्वलनशील असल्याने तो वापरत असताना काळजीपूर्वक वापरावा असे नेहमी सांगितले जाते. एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना एखादी चूक किंवा एखादा बिघाड मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते.
Liquified Petroleum Gas
त्यामुळे एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना दिलेल्या सुचनांच पालन व काळजी घेतली पाहिजे. समजा घरी वापरत असलेल्या गॅस सिलेंडरमुळे एखाद्यावेळी अपघात झाल्यास पुढे काय केले पाहिजे ते देखील काळजीपूर्वक समजून घेतले पाहिजे.
सोबतच गॅस सिलेंडरमुळे एखादा अपघात (स्फोट होणे, गॅस गळती होणे) झाल्यास आपण ग्राहक असल्याकारणाने आपल्याला त्या अपघाताची नुकसान भरपाई मिळते की नाही हे सुद्धा माहिती पाहिजे.
👉Wildlife Compensation 2023 | वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास आता 25 लाख रुपयांची मदत. Vanyaprani Nuksan Bharpai 2023👈
घरी वापराचा गॅस घेतल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना Personal Accident Cover देतात. पण बहुतांश लोकांना एलपीजी (Liquified Petroleum Gas) गॅस सिलेंडरमुळे अपघात झाल्यास विमा कंपनीकडून आर्थिक मदत मिळू शकते ही माहिती नसते.
गॅस सिलेंडरमुळे एखादा अपघात झाल्यास आपल्याला जवळपास 50 लाख रुपये पर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते. पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपनीशी भागीदारी असते त्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची असते.