
Rain Update Maharashtra | राज्यात उद्यापासून होणार पावसाला सुरुवात; हवामान विभागाचा अंदाज जाहीर
IMD Alert :- राज्यात ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच पावसाने विश्रांती घेतलेली बघायला मिळाली आहे, काही भागात अतिपाऊस झाला आहे त्यामुळे पावसाने घेतलेली विश्रांती तेथील शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे.
पण काही भागात म्हणावं त्याप्रमाणात पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पण आता लवकरच राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 16 ऑगस्ट पासून पुढे पावसाला सुरुवात होणार आहे.
विदर्भात 16 ऑगस्ट पासून पावसाला सुरुवात होणार आहे. 16 ऑगस्ट रोजी विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचा अंदाज indian meteorological department हवामान खात्याने दिला आहे. सोबतच परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात हलक्या सरींची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.
👉Crop Insurance | आपण 1 रुपयात पीकविमा काढलाय, पण या गोष्टींची पूर्तता केल्याशिवाय पीकविमा मिळणार नाही !👈
17 ऑगस्ट रोजी राज्यातील नांदेड, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे.
तर 18 ऑगस्ट पासून राज्यात विविध जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज सुद्धा हवामान विभागाने वर्तविला आहे. या मध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र व कोकण विभागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिला आहे.