![Lek Ladki Yojana](https://marathi24taas.in/wp-content/uploads/2023/10/Lek-Ladki-Yojana-1-300x150.png)
Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana :- नमस्कार मित्रहो या लेखामध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरुवात करण्यात आलेल्या लेक लाडकी योजेनेबद्दल संपुर्ण माहिती.
सोबतच लेक लाडकी योजनेमद्धे कोणत्या मुली पात्र ठरणार आहे ते, त्या मुलींचे योजनेसाठी पात्रतेचे वय, कुटुंबातील किती मुलींच्या नावे या योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये मिळणार या बद्दल संपुर्णपणे माहिती आपण जाणून घेणार आहोत.
लेक लाडकी योजना Lek Ladki Yojana महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेसंदर्भात काल झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
Lek Ladki Yojana
राज्य सरकारने राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबविण्याच्या निर्णय घेऊन गरीब कुटुंबातील मुलींना लखपति करण्याच्या निर्णय घेतला आहे. या योजनेसंदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केली होती.
या योजनेचा उद्देश :-
या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, सोबतच मुलींचा मृत्यूदर कमी करणे, व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणास प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ कोणाला व कधी मिळणार ?
✅ 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास, दुसऱ्या प्रसूतिच्या वेळेस जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेमद्धे लाभ मिळणार आहे.
✅ पिवळ्या व केसरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये मिळणार.Lek Ladki Yojana
✅ इयत्ता पहिलीमद्धे गेल्यावर 6 हजार रुपये मिळतील.
✅ इयत्ता सहावीमद्धे गेल्यावर 7 हजार रुपये मिळणार.
✅ 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये मिळणार.
✅ मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये मिळणार.
✅ लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्ष्या अधिक नसावे.
अशा रितीने त्या मुलीस एकूण 1 लाख 1 हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे.