IMD
IMD:- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यात काही जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याच्या इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तर त्या संदर्भातच आपण या लेखामध्ये माहिती भागणार आहोत.
मित्रहो संपुर्ण राज्यातून मॉन्सून 12 ऑक्टोबर 2023 पर्यन्त माघारी फिरलेला आहे, सोबतच आता राज्यात थंडी पडायला सुरुवात झाली आहे.
संपुर्ण राज्यात थंडी पडायला सुरुवात झाली असताना राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
IMD
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण विभागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज दिला आहे.
तर पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण कोकणात काही जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
यामध्ये खासकरून सांगली, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने IMD दिलेला आहे, सोबतच कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
हे पण वाचा 👉 Nuksan Bharpai List 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली