Dushkal Yadi 2023 Maharashtra | राज्यातील 40 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर; आपला तालुका जाहीर झाला का

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
76 / 100

Dushkal Yadi 2023 Maharashtra

Dushkal Yadi 2023 Maharashtra

Dushkal Yadi 2023 Maharashtra :- नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखात राज्य सरकारने दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावाधीतिल पार्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भुजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पति निर्देशांक, मृदु आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र, व पिकांची स्तीथी या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन या निर्णया सोबतच्या परिशिष्ठ – अ  मध्ये दर्शविल्यानुसार 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर तर 16 तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा जाहीर करीत आहे.

Dushkal Yadi 2023 Maharashtra

दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या 40 तालुक्यांमध्ये खालील सवलती लागू राहणार.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

1. जमीन महसुलात सूट

2. पीक कर्जाचे पुनर्रगठन

3. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती

4. कृषि पंपाच्या चालू विजबिलात 33.5% सूट

5. शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परीक्षा शुल्कात माफी

6. रोहयो अंतर्गत कामाच्या निकशात काही प्रमाणात शिथिलता

7. आवश्यक तिथे पिण्याचे पानी पुरविण्यासाठी टँकर्स

8. टंचाई जाहीर झालेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज खंडित न करणे

या आदेशान्वये देण्यात येणाऱ्या विविध सवलती पोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.Dushkal Yadi 2023 Maharashtra त्यानुसार या प्रकारणी पुढील उचित कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या विभागास सादर करण्यात यावा.

मदतीचे वाटप सन 2023 च्या खरीप हंगामातील  7/12 मधील पिकांच्या नोंदीच्या आधारे करण्यात यावे.

हंगामातील अंतिम पैसेवारीसाठी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगाअंती आलेल्या पीक निहाय पैसेवारीच्या आधारे कोरडवाहू पिकांचे 33% नुकसान थरविण्यात यावे. प्रमुख पीक नसलेल्या व पीक कापणी प्रयोग न केलेल्या कोरडवाहू पिकांना सुद्धा मदत अनूज्ञेय राहील.

बहुवार्षिक फळपिके व बागायती पिके यांचे 33% पेक्ष्या जास्त नुकसान झाल्याची शहानिशा शेतीनिहाय पंचनामे करून करण्यात यावी.

बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरविण्याचा निकष 7/12 मधील नोंद हा असेल. नुकसानीची तीव्रता ठरविण्यासाठी पंचनामा हा निकष असेल. बहुवार्षिक फळपिके व बागायती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी त्याची नोंद 7/12 मध्ये असणे आवश्यक आहे.

सन 2023 च्या खरीप हंगामातील पीक पाहणी मधील पिकांच्या 7/12 मधील उताऱ्यातील नोंदीबाबत कोणताही आक्षेप उद्भवल्यास त्याचे निराकरण महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील तरतुदीनुसार करण्यात यावे

हे पण वाचा 👉 Nuksan Bharpai List 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई यादी आली

Leave a Comment