Crop Insurance
Crop Insurance:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की राज्यातील या 24 जिल्ह्यांतिल शेतकऱ्यांना अग्रिम 25% पीकविमा मिळायला सुरुवात झालेली आहे.
राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रिम 25% रकमेचे वाटप सुरू झाले आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अग्रिम 25% पीक विमा Crop Insurance मंजूर झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना विम्याचे थेट बँक खात्यावर वितरण सुरू झाले आहे. आतापर्यंत राज्यातील 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून, सुमारे 1 हजार 954 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात येत आहे.
Crop Insurance
यापैकी आतापर्यंत सुमारे 965 कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आतापर्यंत 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांची नोंदणी झालेली आहे, यात केवळ 1 रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिला आहे पीक विमा.
राज्यात एकूण 24 जिल्ह्यात अग्रिम 25% देण्याबाबत अधिसूचना कडल्या होत्या, त्यापैकी 9 जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी विमा देण्याबाबत अंशता आक्षेप घेतलेले आहेत. या आक्षेपच्या अपीलावरील सुनावण्या पूर्ण झाल्यानंतर विमा रक्कम व शेतकरी लाभार्थी संख्येत आणखी मोठी वाढ होणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंढे यांनी दिली