Weather Update
Weather Update:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात बऱ्यापैकी किमान व कमाल तापमानात घट झालेली बघायला मिळत आहे पण, 23 नोव्हेंबर पासून राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर त्यासंदर्भातच माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
मागील काही दिवसांच्या अगोदर राज्यात ढगाळी वातावरण व राज्यातील काही ठराविक जिल्ह्यात आपल्याला हलका पाऊस झाल्याच वृत्त बघायला मिळल आहे.
Weather Update
राज्यात आता काही प्रमाणात थंडी पडायला सुरुवात होताच अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात 23 नोव्हेंबर 2023 पासून पुढे बहुतांश जिल्ह्यात मध्यम ते जोरदार अवकाळी पाऊस Weather Update होण्याचा अंदाज दिला आहे.
यामध्ये राज्यात 23 नोव्हेंबर रोजी सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे तर,
24 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यातील अहमदनगर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तविला आहे