Namo Shetkari 2nd Installment
Namo Shetkari 2nd Installment :- नमस्कार शेतकरी मित्रहो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजेनचा दूसरा या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता नाही आहे तर काय कारण आहे ते आपण या लेखात बघणार आहोत.
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 15 वां हप्ता हा 15 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्यात आला तर.
पीएम किसान च्या धर्तीवर चालू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. पण पीएम किसान प्रमाणेच नमो शेतकरी योजनेपासून काही शेतकरी वंचित राहिले होते.
Namo Shetkari 2nd Installment
आणि मित्रहो आता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पीएम किसान योजनेच्या 16 व्यां हप्त्याच वितरण करण्यात येणार आहे, आणि पीएम किसान योजनेचा 16 वां हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळणार त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी Namo Shetkari 2nd Installment योजनेचा दूसरा हप्ता मिळणार आहे.
पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेपासून जे शेतकरी अजूनपर्यंत वंचित राहिले आहे अश्या शेतकऱ्यांचा योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायशी प्रमाणीकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडम यांनी दिले आहेत.
Beneficiary Status
या मोहिमे अंतर्गत ई-केवायशी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, आदि बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी ई-केवायशी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाइलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे.
मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधिं राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषि संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.