PM Kisan Mandhan Yojana :- शेतकऱ्यांंना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने सरकार विविध योजना आखत आहे. यामध्ये अशीच एक योजना म्हणजे ‘पीएम किसान मानधन योजना’ होय. शेतकऱ्यांच्या फेंदयसाठी हो योजना राबविण्यात येत आहे, तर जाणून घेऊयात या योजनेबद्दल पूर्णपणे माहिती.
या योजनेअंतर्गत वयाची 60 वर्षे ओलांडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शेकते . साधारणपणे उतारवयात शेतकऱ्यांना शेती करता येत नाही तेव्हा त्यांना आर्थिक मदतीसाठी इतरांवर अवलंबून रहाव लागत. ही बाब लक्ष्यात घेऊन केंद्र सरकारने ‘पीएम किसान मानधन योजना’ PM Kisan Mandhan Yojana सुरू केली आहे.
काय आहे पीएम किसान मानधन योजना ?
ही देशातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची पेंशन योजना आहे, या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी पात्र असतात व ते नोंदणी करू शकतात.
PM Kisan Mandhan Yojana
शेतकरी कितीही वयात (वय 18 ते 40 दरम्यान) या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी त्यांना वयानुसार दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील, यानंतर वयाची 60 वर्षे झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये (वर्षाला 36,000 रुपये) पेंशन म्हणून दिले जाते.
अर्ज कसा करायचा ?
अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटर ला भेट द्या. सोबतच आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, सातबारा उतारा, बँक खाते पासबुक सोबत असणे आवश्यक आहे.
Sidin Mata mandir taluka samgrapur gaon wahegaon (H)