Mansoon 2024 Prediction | ला-निनामुळे यावर्षीचा मान्सून धो-धो बरसणार ! El Nino जाऊन La-Nina येणार का ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
82 / 100

Mansoon 2024 Prediction

Mansoon 2024 Prediction

Mansoon 2024 Prediction :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी एल-निनो सक्रिय राहणार की ला-निना राहणार व त्याचा भारतीय मान्सून वर काय परिणाम होणार ते आपण आज या लेखात पाहणार आहोत.

एल निनो आणि ला निना या समुद्रामध्ये आलटून पालटून घडणाऱ्या दोन घटना आहे, शेतीच्यादृष्टीने पाहावयास झाल्यास एल निनो जेव्हा सक्रिय असतो त्या वेळेस दुष्काळ सदृश्य परिस्तिथी किंवा कोरडा दुष्काळ पडतो. किंवा काही ठिकाणी खूप अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडतो त्यालाच एल निनो असे म्हणतो.

ला निना ज्यावेळेस सक्रिय असतो त्यावेळेस पाऊस हा वेळेवर येतो आणि सर्वत्र सरासरी सारखा पाऊस पडतो. त्यामुळे पिकांसाठी पोषक वातावरण राहिल्याने पिके देखील चांगले येतात.

Mansoon 2024 Prediction

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या एल-लिनो चा प्रभाव कमी होणार असल्याने देशातील नैऋत्य मोसमी पाऊस 2024 चांगला पडेल अशी अपेक्षा विविध हवामान संस्थांनी व्यक्त केली आहे.

गेले 2023 वर्ष सर्वात उष्ण ठरले. कारण एल-निनो सक्रिय होता, त्यामुळेच देशात गेल्या मान्सून हंगामात पाऊस कमी झाला त्यामुळे देशात पानी टंचाई सदृश्य परिस्तिथी निर्माण होण्याची भीती आहे.

यामध्येच देशातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे, ति म्हणजे प्रशांत महासागरात ला-निना ची स्तिथी सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे, अमेरिकेच्या नोआ (National Oceanic And Atmospheric Administration) या संस्थेने ही शक्यता वर्तविली आहे.

नोआनुसार एप्रिल-जूनपर्यंत  ‘एल-निनो’ सामान्य असण्याची शक्यता 79% आहे, आणि जून-ऑगस्टमध्ये ‘ला-निना’ सक्रिय होण्याची शक्यता 55% आहे.

Mansoon 2024 Prediction

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव डॉ. एम. राजीवं यांनी सांगितले की हवामान अंदाज मॉडेल हे आशादायक चिन्हं दर्शवत आहे. एल-निनो कमकुवत होतो आहे आणि या वर्षी जुलैपर्यंत ला निनाचा संभाव्य विकास होण्याची 50 टक्क्यांपेक्षा जास्त शक्यता आहे. यामुळे 2024 चा मान्सून Mansoon 2024 Prediction चांगला राहण्याची शक्यता अपेक्षा वाढवते. ला-निना वर्षामध्ये सामान्यता चांगला मान्सून पाऊस पडतो.

भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. डी. शिवानंद पै म्हणाले की सध्याच्या हवामान स्तिथीबाबत निश्चित भाष्य करता येत नाही. कारण काही हवामान मॉडेल ला-निना चा अंदाज देत आहे तर काही एल-निनो सामान्य राहील असेही संगत आहे.

Leave a Comment