Nuksan Bharpai Yadi 2023 | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! नुकसान भरपाईचा GR आला; इथे बघा या जिल्ह्याची यादी

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
77 / 100

Nuksan Bharpai Yadi 2023

Nuksan Bharpai Yadi 2023

Nuksan Bharpai Yadi 2023:- नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेतीजमिनीचे नुकसान झालेला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे! तर त्या संदर्भात या लेखामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत.

जून ते ऑक्टोबर, 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्तिथीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमीनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्र.1 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.13661.06 लक्ष (अक्षरी रुपये एकशे छत्तीस कोटी एकसष्ट लक्ष सहा हजार फक्त) इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकाच्या नुकसानीकरीत वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमद्धे या प्रस्तांवाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद नीधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.27.03.2023 व दि.09.11.2023 नुसार जिरायत पिके, बागायत पीके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित Nuksan Bharpai Yadi 2023 दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी.

शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.09.11.2023 नुसार शेतजमीनीच्या नुकसानीकरीता मदत बीगर अल्प-भूधारक शेतकऱ्यांना देखील 2 हेक्टर मयादेत अनुज्ञेय करण्यात आली असून शेतजमीनीचे नुकसान झाल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे.

Nuksan Bharpai Yadi 2023

वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबधितांनी करावी.

👉Rabi Crop Insurance Last Date 2023 | रब्बी पिकांचा पीक विमा भरण्यासाठी ही आहे शेवटची तारीख ; आपण पीक विमा भरला नसेल तर लगेच भरा

तसेच राज्य शासनाने घोषित केलेल्या अततिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीकरिता अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 मी..मी.पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावामध्ये 33 टक्के पेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत अनुज्ञेय राहील.मात्र, ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतीवृष्टीचा निकष लागू राहणार नाही.

लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानांतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या सांकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. या आदेशाव्दारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निगर्मीत केलेल्या आदेशाव्दारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये याकरीता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निगर्मीत कराव्यात. या सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबधित जिल्हाधिकारी यांची राहील.

👉Cyclone Michaung Alert | देशावर अवकाळीचं संकट; येत्या 48 तासांत चक्रीवादळ धडकणार ! या राज्यांना मुसळधारेचा इशारा
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईची रक्कम 

1. नाशिक

2. धुळे.

3. नंदुरबार.

4. जळगाव.

5. अहमदनगर.

6. नांदेड.

7. लातूर.

8. नागपूर.

9. भंडारा .

10. वर्धा.

11. गोंदिया.

12. चंद्रपूर.

13. गडचिरोली.

14. पालघर.

15. रायगड.

16. रत्नागिरी.

17. सिंधुदुर्ग

✅ GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा 
👉Panjabrao Dakh Havaman Andaj | पंजाबराव म्हणतात ! राज्यात 2 डिसेंबर पर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा

Leave a Comment