Dushkal Nuksan Bharpai 2024
Dushkal Nuksan Bharpai 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाद्वारे राज्यातील 224 महसूल मंडळात दुष्काळी परिस्तिथी चा एक निर्णय घेण्यात आला असून ते कोणते मंडळ आहे व त्या मंडळात कोणत्या सवलती मिळणार या संदर्भात आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
कमी पावसामुळे दुष्काळी परिस्तिथी असलेल्या 40 तालुक्यांचा समावेश हा दुष्काळी स्तिथी म्हणून राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. आता जाहीर केल्यानुसार 19 जिल्ह्यांमधील 224 महसुली मंडळाचा यामध्ये समावेश आहे.
या आधीप्रमाणे नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळ सदृश्य मंडळात सर्व सवलती तातडीने लागू केलेले आहेत. त्यामुळे राज्य शासनाच्या या सवलती चा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे शासनाचे म्हणणे आहे.
Dushkal Nuksan Bharpai 2024
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जमान 750 मी. मी. पेक्षा कमी झाले आहे.
👉Mansoon 2024 Prediction | ला-निनामुळे यावर्षीचा मान्सून धो-धो बरसणार ! El Nino जाऊन La-Nina येणार का ?👈
अशा वर नमूद दि.10 नोव्हेंबर, 2023 च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ठ “अ” येथे नमूद केलेल्या एकूण 1021 महसुली मंडळाांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत.
आणि त्या महसूली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी, लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट “अ” मध्ये दर्शविललेली 224 नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश्य मंडळे Dushkal Nuksan Bharpai 2024 म्हणून घोषित करून या महसुली मंडळाकरीता खालील सवलती लागू करण्यास शासनाने मंजूरी दिलेली आहे.
खालीलप्रमाणे सवलती लागू राहणार:-
- 1) जमीन महसूलात सूट.
2) सहकारी कर्जाचे पुनर्रगठन.
3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती.
4) कृषि पंपाच्या चालू विजबिलात 33.5% सूट.
5) शालेय/ महाविद्यालयीं विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
6) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
7) आवश्यक तिथे पिण्याचे पानी पुरविण्यासाठी टँकर्स चा वापर.
8) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करने.
👉Harbhara Bajarbhav | हरभरा बाजारभावात मोठी वाढ ! राज्यातील ‘या’ बाजार समितीमध्ये हरभऱ्याला रु. 13500/- इतका विक्रमी दर मिळतोय👈
जिल्हयानुसार मंडळे :
- पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक
- धुळे, जळगाव, अहमदनगर
- छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड.
- लातूर, बीड, धाराशीव, नागपूर, वर्धा