PM Kisan Scheme 2024
PM Kisan Scheme 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, फेब्रुवारी शेवट पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रुपये 6000/- जमा होणार आहे तर आपण या लेखात जाणून घेणार आहोत कोणत्या योजनेचे पसी जमा होणार ते.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवित आहे, या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक 6000/- रुपये 3 हप्त्यांमध्ये देण्यात येते.
सोबतच केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करून राबवित आहे.
PM Kisan Scheme 2024
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आतापर्यंत शेतकऱ्यांना पहिला हप्ता (2000/-) मिळाला असून शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे.
मित्रहो, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत एकूण 15 हप्ते देऊन झालेले आहे, PM Kisan Scheme 2024 आणि आता 16 वां हप्ता दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी यवतमाळ येथील विशेष कार्यक्रमातून प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करणार आहे.
👉Weather Update For 25 February 2024 | तो पुनः येतोय ! हवामान खात्याचा या 15 जिल्ह्यांना मुसळधार वादळी पावसाचा इशारा ; आपल्या जिल्ह्यात होणार का पाऊस ?👈
सोबतच शेतकरी मित्रहो राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दूसरा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे व तो हप्ता या महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे.
नमो शेतकरी दूसरा हप्ता GR
सोबतच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा तिसरा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंबंधी प्रसिद्धी पत्रक सुद्धा जाहीर केले आहे. योजनेचा दूसरा व तिसरा हप्ता या महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
नमो शेतकरी तिसरा हप्ता GR
तर शेतकरी मित्रहो, पीएम किसान चा 16 वां हप्ता (रु.2000/-) आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दूसरा व तिसरा हप्ता (दोन्ही हप्ते मिळून रु.4000/-) असे एकूण रु. 6000/- पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.