Nandura Urban Bank Scam Update
Nandura Urban Bank Scam Update :- नमस्कार मित्रहो, एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे की राज्यातील आणखी एका बँकेत घोटाळा झाला आहे, ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही बातमी बुलढाणा जिल्ह्यातील असून येथील एका बँकेत पैश्याची अफरातफर तेथीलच एका अधिकाऱ्याने केली आहे, सदर घोटाळा हा नांदुरा अर्बन बँकेतील असून 5 कोटी 45 लाख रुपयांचा घोटाळा आहे घोटाळेबाज अधिकाऱ्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे.
Nandura Urban Bank Scam Update
सदर आरोपी गजानन शर्मा असून नांदुरा अर्बन बँकेत कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याने इतर कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं सदर बँकेतील 5 कोटी 45 रुपये इतर बँकांच्या विविध खात्यात ट्रान्सफर Nandura Urban Bank Scam Update केली आहे. ही बाब बँकेच्या संचालकाच्या लक्षात येताच आरोपी विरोधात नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, व आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
या घोटाळ्यांमुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यानंतर बँक व्यवस्थापकाकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून कोणीही घाबरून जावू नये असे सांगण्यात आले आहे. ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याचा दावा सदर बँकेकडून करण्यात आला आहे.