Reshim Udyog Yojana 2024 Maharashtra
Reshim Udyog Yojana 2024 Maharashtra :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्य सरकार शेतीबद्दलच्या व शेतिजोडधंद्याच्या संबंधित विविध प्रकारच्या योजना राबवित असते. आता रेशीम उद्योगासाठी लागण्याऱ्या शेडसाठी सरकार रु. 40 लाख पर्यंतचे अनुदान देणार आहे.
रेशीम उद्योग हा कृषी व वनसंपत्तीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असणारा उद्योग आहे. राज्यातील हवामान हे रेशीम शेतीसाठी पोषक आहे. वातावरणाच्या लहरिपणामुळे होणार नुकसान टाळण्यासाठी तसेच नियमीत व हमखास उत्पन्न मिळवण्यासाठी रेशीम उद्योग हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतकऱ्यांना तसेच रेशीम उद्योजकांना चालना देण्यासाठी दि.02 जून, 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 मधील परीच्छेद 7.7 ई नुसार स्वयंचलित रीलिग मशीन/मल्टियाण्ड रिलींग मशीन टिस्टींग युनीट करीता शेड उभारण्यास अनुदान देय करण्यासाठी राज्य योजना घोषीत करण्यात आली आहे.
रेशीम उद्योगामध्ये रोजगार निर्मितीला असणारा वाव विचारात घेता रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी आणण्यासाठी व चालणा मिळण्यासाठी कोषोत्तर प्रक्रिया करण्याऱ्या रेशीम उद्योगातील स्वयंचलित रिलिग मशीन/ मल्टीएन्ड रिलींग मशीन/ ट्विस्टींग युनीट स्थापन करणाऱ्या उद्योजकांना सदर मशनरीसाठी शेड उभारण्यास अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील रेशीम उद्योगाच्या विकासासाठी राज्यात उत्पादित होणाऱ्या कोषावर प्रक्रिया करून धाग्यांपर्यंत निर्मिती होण्यासाठी स्वंयचलित रिलींग मशीन /मल्टीएन्डस् रिलींग मशीनरी/ट्विस्टींग मशीनरीकरीता पात्र लाभार्थ्यांना शेड उभारणीसाठी खालीलप्रमाणे अनुदान देण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
Reshim Udyog Yojana 2024 Maharashtra
1 . स्वयंचलित रिलींग मशीन(अेआरएम) (किमान 400 एन्डस् किंवा 40 बेसिन) करीता शेड उभारणी
- शेड बांधकाम क्षेत्रफळ – 10000 स्के. फुट
- डीएसआर दरानुसार इमारत बांधकाम करण्यासाठी येणारया खर्चाचे 50 टक्के किंवा रु. 40.00 लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल.
👉Sanman Dhan Yojana 2024 | राज्यातील या कामगारांना योजनेअंतर्गत दरवर्षी रु. 10,000/- मिळणार ; GR सुद्धा आला.👈
2. स्वयंचलित रिलींग मशीन(अेआरएम) (किमान 200 एन्डस् किंवा 20 बेसिन) करीता शेड उभारणी
- शेड बांधकाम क्षेत्रफळ – 6000 स्के. फुट
- डीएसआर दराच्या 50 टक्के किंवा रु.20.00 लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल.
3. स्वयंचलित रिलींग मशीन(अेआरएम) (किमान 120 एन्डस् किंवा 12 बेसिन) करीता शेड उभारणी
- शेड बांधकाम क्षेत्रफळ – 4000 स्के. फुट
- डीएसआर दराच्या 50 टक्के किंवा रु.15.00 लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल.
4. मल्टीएन्डस् रिलींग मशीन (किमान 100 एन्डस् 10 बेसिन) करीता शेड उभारणी
- शेड बांधकाम क्षेत्रफळ – 1500 स्के. फुट
- डीएसआर दराच्या 50 टक्के किंवा रु.3.00 लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल.
5. ट्विस्टींग मशीन करीता शेड उभारणी Reshim Udyog Yojana 2024 Maharashtra
- शेड बांधकाम क्षेत्रफळ – 3000 स्के. फुट
- डीएसआर दराच्या 50 टक्के किंवा रु.6.00 लक्ष यापैकी जे कमी असेल तितके अनुदान देण्यात येईल.
👉Regular Crop Loan Waiver 2024 | राज्य शासनाचा मोठा निर्णय ! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रु. 50000/- ची मदत.👈
लाभार्थी अहर्ता :-
- वैयक्तिक लाभार्थी
- कंपनी
- सहकारी संस्था
- बचत गट
- आशासकीय संस्था
लाभार्थी निवडीचे निकष :-
- रेशीम उद्योगाशी निगडीत क्षेत्रातील वैयत्क्तिक लाभार्थ्यांनी Reshim Udyog Yojana 2024 Maharashtra स्व:निधीतून स्वंयचलित रिलींग मशीन/मल्टीएन्डस् रिलींग मशिनरी /ट्विस्टींग मशीनरी उभारणारे आवश्यक.
- सिल्क समग्र-2 योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी स्वंयचलित रिलींग मशीन/मल्टीएन्डस् रिलींग मशीनरी /ट्विस्टींग मशीनरी उभारणारे आवश्यक.
- वैयत्क्तिक लाभार्थी यांना स्वयंचलित रिलींग मशीनचे कामकाजाबाबत केंद्रीय रेशीम मंडळाकडील प्रशिक्षण अनिवार्य.
- कंपनी, सहकारी संस्था,बचत गट व अशासकीय संस्था यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीस स्वयंचलित रिलींग मशीनचे कामकाजाबाबत केंद्रीय रेशीम मंडळाकडील प्रशिक्षण अनिवार्य