CM Cabinet Decision Today | राज्यात सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू ! मंत्रीमंडळ बैठकीत 19 महत्वाचे निर्णय

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
81 / 100

CM Cabinet Decision Today

CM Cabinet Decision Today

CM Cabinet Decision Today :- नमस्कार मित्रहो, आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते. 

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :

✅ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

✅ राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली

✅ गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ

✅ ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार

CM Cabinet Decision Today

✅ थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी

✅ पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार

✅ नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

✅ सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी

✅ शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत

✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ

✅ ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी #महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार

✅ ‘बार्टी’ च्या ‘त्या’ ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ

✅ मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार

✅ कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ

✅ कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ

✅ चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल

✅ श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना

✅ पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य

✅ सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन

👉Weather Update Maharashtra | हवामान विभागाचा या जिल्ह्यांना रेड अलर्ट ; नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला !

Leave a Comment