Mutual Funds Investment | SIP करून खरंच पुढच्या 10 वर्षात करोंडपती होता येतंय का ?

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
77 / 100

Mutual Funds Investment

Mutual Funds Investment

Mutual Funds Investment :- नमस्कार मित्रहो, SIP करून खरंच पुढच्या 10 वर्षात करोंडपती होता येतंय का ? याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या या आगळ्या वेगळ्या लेखात जाणून घेणार आहोत.

मित्रहो, आपल्यापैकि बरेच लोकांनी ‘म्यूचुअल फंड निवेश बाजार जोखीम के अधिन है योजना संबंधी सभी दस्तावेजो को सावधानी से पढे’ या प्रकारचे वाक्य टीव्ही जाहिरातींमध्ये व सोशल माध्यमांतून ऐकलेले असतील.

यामध्ये मित्रहो, तुम्हाला जर करोंडपती बनायचे असेल तर फक्त शंभर रुपये पासून सुरुवात करून तुम्ही सहजरीत्या करोंडपती बनू शकता अश्या पद्धतीने वेगवेगळ्या सेलिब्रिटींना घेऊन सोशल मीडिआवर जाहिरात केली जाते.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

SIP म्हणजे काय ?

SIP म्हणजे सिस्टीमॅटीक इंव्हेस्टमेंट प्लान. यामध्ये दररोज, साप्ताहिक, प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्याला जसे तुम्ही ठरवाल तस ती विशिष्ट म्यूचुअल फंड कंपणी तुमच्या बँक खात्यातून तुम्ही जेवढे ठरवलेले असता तेवढे पैसे कापून घेते आणि ते पैसे स्टॉक मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये गुंतवून, कंपनी तया गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा मिळवून देते.

Mutual Funds Investment

तुम्ही जर 500 रुपये गुंतवले आणि तुम्ही ज्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणार आहात त्याची जर समजा किंमत 50 रुपये प्रती यूनिट असेल तर तया 500 रुपयांमधून, त्या म्यूचुअल फंडचे 10 यूनिट मिळतील. आता एक बाब लक्ष्यात घ्या या फंडचे हे जे मूल्य असते. (ही जी किंमत आहे 50 रुपये) हे कालांतराने वाढत जाते आणि त्यानुसार तुम्हालाही फायदा होतो. आणि जर समजा ही किंमत कमी झाली तर तुम्हाला तोटा होतो. पण शक्यतो लॉन्ग टर्म मध्ये कुठल्याही कंपनीची किंमत वाढत जाते. त्यामुळे SIP मध्ये तुम्ही लॉन्ग टर्म साठी इंव्हेस्टमेंट करत असाल तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतातच. असं आजपर्यंत दिसून आलेल आहे.

बँकेची फिक्स्ड दीपाजिट की SIP गुंतवणूक :-

बँक खातं आणि SIP गुंतवणूक यामधील मोठा फरक आहे तो म्हणजे असलेली रिस्क आणि त्यामधून मिळणारा फायदा. मित्रहो, बँकेत ठेवलेले पैसे हे सुरक्षित असतात पण त्यावर आपल्याला वार्षिक व्याज हे साधारणपणे 6 ते 8 टक्केंपर्यंत मिळत असते.

SIP मध्ये बँकेपेक्षा थोडी रिस्क जास्त असते. आतापर्यंत म्यूचुअल फंडाचा अभ्यास केला असता SIP च्या गुंतवणुकीला 12 ते 16 टक्केपर्यन्त किंवा जास्त प्रमाणात रिटर्न्स मिळालेले दिसून आलेले आहे.

म्यूचुअल फंडात गुंतवणूक कशी करतात ?

SIP च्या माध्यमातून दररोज, साप्ताहिक, प्रत्येक महिन्याला किंवा तीन महिन्याला जसे तुम्ही ठरवाल तसे पैसे म्यूचुअल फंडात तुम्ही गुंतवणूक करू शकतात.

LUMPSUM च्या माध्यमातून तुम्ही एकाचवेळी अधिक पैसे म्यूचुअल फंडात गुंतवणूक करू शकता.

मित्रहो, तुम्हाला जर करोंडपती बनायचे असेल तर फक्त शंभर रुपये पासून सुरुवात करून तुम्ही सहजरीत्या करोंडपती बनू शकता अश्या पद्धतीने वेगवेगळ्या सेलिब्रिटींना घेऊन सोशल मीडिआवर जाहिरात केली जाते तसं वैगेरे नाही आहे. यामध्ये जरा बँकेपेक्षा रिटर्न्स जास्त मिळते पण रिस्क सुद्धा तेवढीच आहे. यामध्ये तुम्हाला 10 ते 15 वर्षाचा विचार करून जर गुंतवणूक करत असाल तर यात चांगले रिटर्न्स मिळण्याची दाट शक्यता आहे.

👉PM Kisan Link Fraud | पीएम किसान ची लिंक ओपन करताय ; तर बँक खाते होणार रिकामे ! वाचा काय बातमी आहेत ?

Leave a Comment