Crop Insurance
Crop Insurance :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्य शासनाच्या माध्यमातून रु. 26 कोटींचा पीकविमा मंजूर करण्यात आला असून त्यासंदर्भात शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आला आहे तर तो पीकविमा कोणत्या पिकासाठी आहे ते या लेखात आपण पाहणार आहोत.
शेतकरी मित्रहो, फळपीक असो वा इतर दुसरे पीक. या पिकांचे नुकसान हवामानातील विवध धोक्यांमुळे होत असते व त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाच्या माध्यमातून पीकविमा योजना राबविण्यात येते.
Crop Insurance
सदर पीकविमा हा फळपिकांसाठी असून राज्य शासनाने दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध करून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार 2023-24 साठी राज्य हिस्सा अंतर्गत संबंधित पीकविमा कंपनीला निधी वितरणासाठी मान्यता दिली आहे.
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेत आंबिया बहार सन 2023-24 या आर्थिक वर्षातील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाची रक्कम रु.26,37,79,192/- इतका निधी उपलब्ध करुन देण्याबाबत संदर्भ क्र. 4 च्या पत्रान्वये विनंती केली होती. त्यास अनुसरुन रु.26,37,79,192/- इतकी रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार इतका निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमीटेड यांना उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
शासन निर्णय :- इथे पहा
👉CM Cabinet Decision Today | राज्यात सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू ! मंत्रीमंडळ बैठकीत 19 महत्वाचे निर्णय