Jio New Recharge Plan :- नमस्कार मित्रहो, JIO ने आज आपले नवीन 2 रीचार्ज प्लान लॉंच केले आहे, ही प्लान विनाडेटा मिळणार असून यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग व एसएमएस सुविधा मिळणार आहे तर त्यासंदर्भात आजच्या या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.
TRAI ने काही दिवसापूर्वी देशातील सर्व टेलीकॉम कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांसाठी डेटाशिवाय रीचार्ज प्लान सुरू करण्याचे निर्देश दिले होते. आपल्याला माहिती आहे की जवळपास सर्वच टेलीकॉम कंपन्यांचे रीचार्ज प्लान मध्ये आपल्याला इंटरनेट डेटा, एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते आहे.
Jio New Recharge Plan
पण देशात असे सुद्धा ग्राहक आहेत की ते डेटा सुद्धा वापरत नाही आणि त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे अश्या ग्राहकांसाठी TRAI ने सर्व टेलीकॉम कंपन्यांना यासंदर्भात निर्देश दिले होते.
JIO ने TRAI च्या नियमांचे पालन करत आज 23 जानेवारी 2025 रोजी 2 नवीन रीचार्ज प्लान सादर केले आहे. JIO चे ही दोन्ही प्लान 84 दिवस आणि 365 दिवसांच्या वैधतेसह आहे तर यासंदर्भात जाणून घेऊ या.
458 रुपयांचा प्लान :
JIO ने आपल्या 46 कोटी ग्राहकांसाठी हा प्लान लॉंच केला असून या प्लानमध्ये ग्राहकांना 84 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंगसह, रोमिंग फ्री आणि 1000 SMS चा लाभ मिळतो. यासोबतच JIO Cinema, JIO TV यासारख्या आप्लीकेशन चे सब्स्क्रिप्शन देत आहे.
1958 रुपयांचा प्लान :
JIO ह्या प्लानमध्ये 365 दिवसासाठी वैधता मिळत असून प्लानमध्ये अलिमिटेड कॉलिंग, रोमिंग फ्री आणि 3600 SMS चा लाभ मिळतो आहे. यासोबतच JIO Cinema, JIO TV यासारख्या आप्लीकेशन चे सब्स्क्रिप्शन देत आहे.