Farmer Subsidy 2025
Farmer Subsidy 2025 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे” या योजनेस संदर्भाधीन क्र.1 येथील दि.09.07.2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे.
Farmer Subsidy 2025
या योजनेअंतर्गत राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी सन 2024 च्या काजू हंगामासाठी विक्री केलेल्या काजू बी साठी प्रती किलो रु.10/- याप्रमाणे किमान 50 किलो व कमाल 2000 किलो या मर्यादेत शासन अनुदान देण्यात येणार आहे.
उपरोक्त योजनेअंतर्गत पात्र लाभार्थीसाठी कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य काजू मंडळ यांनी संदर्भ क्र.2 येथील पत्रान्वये केलेल्या मागणीनुसार, चालू आर्थिक वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पित झालेल्या रु.10.00 कोटी इतक्या निधी पैकी रु.3.3652 कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासन अनुदान देणे” या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात रु.3.3652 कोटी निधी वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय :- इथे पहा