Ladki Bahin Scheme On Ajit Pawar
Ladki Bahin Scheme On Ajit Pawar :- नमस्कार, आज आपण महाराष्ट्राच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताज्या वक्तव्याबद्दल बोलणार आहोत. अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं की राज्य सरकार आपल्या लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देऊ इच्छिते,
पण हे फक्त राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरच शक्य होईल. ते म्हणाले, “आमची परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 देऊ.” हे वक्तव्य 20 मार्च 2025 रोजी विधानसभेत केल, जेव्हा त्यांना 2024 च्या निवडणूक जाहीरनामानुसार रक्कम कधी वाढणार असं विचारलं गेलं.
Ladki Bahin Scheme On Ajit Pawar
सध्या, या योजनेअंतर्गत 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत, ज्यासाठी राज्याला 3700 कोटी रुपये खर्च करावे लागतात. अजित पवार यांनी म्हटल की आता हा लाभ फक्त गरजू आणि मेहनती महिलांनाच मिळेल. चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या किंवा अपात्र महिलांना यातून वगळलं जाऊ शकतं. पण आधी दिलेली रक्कम परत घेतली जाणार नाही.
ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू झाली आणि आतापर्यंत आठ-नऊ हप्ते दिले गेले आहेत. फेब्रुवारी आणि मार्च 2025 चे हप्ते महिला दिनानिमित्त जारी झाले. 2025-26 च्या अर्थसंकल्पात रक्कम वाढवण्याची घोषणा न झाल्याने प्रश्न उपस्थित झाले होते.
ज्याला उत्तर देताना पवार म्हणाले की योजना बंद होणार नाही, तर ती अधिक चांगली करण्यासाठी पुनरावलोकन होईल. हे सूचक वक्तव्य दर्शवतं की सरकार 2100/- देण्यास तयार आहे, पण आर्थिक स्थिरता आल्यानंतरच या गोष्टि होऊ शकते.