Havaman Andaj Today | राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात ; पुढील 24 तास या जिल्ह्यासाठी महत्वाचे !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100 SEO Score

Havaman Andaj Today 15

Havaman Andaj Today

Havaman Andaj Today :- नमस्कार मित्रहो, राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय झाला असून बहुतांश जिल्ह्यात नाले भरून वाहताना पाहायला मिळत आहे, यामध्ये खासकरून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळताना दिसतो आहे. 

अशातच भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या दिनांक 19 मे 2025 रोजी सायंकाळच्या वेळेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा होतो आहे. 

Havaman Andaj Today

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पुढील 24 तासात म्हणजेच 20 मे 2025 च्या सायंकाळपर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून त्यामध्ये अहिल्यानगर, पुणे, लातूर, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला असून काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

यासोबतच विदर्भातील संपुर्ण जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच मराठवाडा, कोकण व उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

✅Ladki Bahin Scheme On Ajit Pawar | या लाडकी बहिणींना मिळणार 2100/- अजित पवारांच वक्तव्य.

Leave a Comment