Citizens Pension Scheme 2024
Citizens Pension Scheme 2024 :- नमस्कार मित्रहो, राज्य शासनाने एक शासन निर्णय प्रसिद्ध करून राज्यातील पात्र नागरिकांना दरमहा रुपये 11,000/- देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे ते.
मित्रहो, दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या व्यक्ती व डिसेंबर 1949 पर्यंत वा तदनंतर पदमुक्त झालेल्या राज्यातील माजी सैनिकांना / त्यांच्या विधवांना राज्य शासनाच्या माध्यमातून मासिक निवृत्तीवेतन देण्यात येते.
यामध्ये सुरूवातीला रुपये 300/- याप्रमाणे निवृत्तीवेतन देण्यात येत होते. शासन निर्णय 18 सप्टेंबर 2018 रोजी घेण्यात आल्यानुसार आतापर्यंत या व्यक्तींना रुपये 6000/- प्रमाणे मासिक अर्थसहाय्य देण्यात येत आहे.
Citizens Pension Scheme 2024
दिवसेदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सदर रक्कम लाभार्थ्यांना निर्वाहाच्या दृष्टीने अत्यंत कमी असल्याकारणाने यामध्ये वाढ करण्याचा शासनाचा विचार होता.
👉Crop Insurance List 2024 Update | पिकविम्याचे 83 कोटी रुपये सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा ! यादीमध्ये नाव पहा👈
त्यामुळे 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये यामध्ये तब्बल रुपये 5000/- ची वाढ करण्यात आली असून यापुढे या व्यक्तींना रुपये 11,000/- याप्रमाणे मासिक अर्थसहाय्य Citizens Pension Scheme 2024 मिळणार आहे. आणि 1 जानेवारी 2024 पासून ही मदत योजना लागू असणार आहे.