Solar Pump List Maharshtra
Solar Pump List Maharshtra :- नमस्कार शेतकरी मित्रहो, शेती म्हणाल तर वीज, रस्ता आणि पानी महत्वाचे असते, यामध्ये शेतकऱ्यांकडे पानी उपलब्ध असते पण वीज नसते. त्यामुळे शेतकरी विद्युत विभागाकडे विजेची मागणी करतो.
त्यानंतर त्याला विद्युत विभागाकडून वीज मिळाल्यानंतर शेतकऱ्याला विजेच्या वापरामुळे विजबिल सुद्धा भरावे लागते, त्यामुळे शेतकरी आता यावर पर्याय म्हणून सौर कृषि पंपाकडे बघतो आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यासह देशात सौर कृषि पंपाची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे पण सौर पंपाचा साठा मर्यादेत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना सौर कृषि पंप मिळणे शक्य होत नाही.
हे पण वाचा 👉Drought Relief Fund | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड ! लवकरच 5 कोटी 95 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
Solar Pump List Maharshtra
राज्यात 2 लाख सौर कृषि पंप बसविण्यासाठी एक शासन निर्णय काढलेला आहे. दिनांक 5 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाख सौर कृषि पंप Solar Pump List Maharshtra देण्यासाठी मंजूरी दिलेली आहे.
राज्यातील सौर कृषि पंप मागणी केलेले शेतकरी आणि पीएम कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांकडून आतापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जातून जेष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात 2 लाख कृषि पंप बसविले जाणार आहे.