IMD Alert For 28 to 30 March 2024
IMD Alert For 28 to 30 March 2024 :- नमस्कार मित्रहो, राज्यात काही जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलेला पाहायला मिळतो तर काही जिल्ह्यात स्थानिक वातावरण तयार होऊन वादळी पाऊस बघायला मिळतो.
यामध्ये आता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील 3 दिवस राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे तर काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
IMD Alert For 28 to 30 March 2024
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 28 मार्च रोजी जळगाव, नाशिक, बीड, परभणी, हिंगोली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे, IMD Alert For 28 to 30 March 2024 तर 29 मार्च रोजी सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात सुद्धा उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज दिला आहे.
हे पण वाचा 👉Drought Relief Fund | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड ! लवकरच 5 कोटी 95 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
सोबतच दिनांक 30 मार्च रोजी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देऊन या ठिकाणी वीजांसह वादळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. बीड, धाराशीव, सोलापूर या जिल्ह्यात सुद्धा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.