Ladki Bahin Yojana Next installment
Ladki Bahin Yojana Next installment :- राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता रु. 1500 बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत. यापूर्वी अदिती तटकरे मंत्री, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले होते की लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारी पर्यंत जमा करण्यात येणार आहे.
आपल्यापैकी कुणाच्या बँक खात्यावर हप्ता जमा नसेल झाला तर तो 26 जानेवारी पर्यंत जमा होऊ शकतो. आता पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र महिलांच्या बँक खात्यावर एकूण रु. 9000 जमा करण्यात आलेले आहे.
Ladki Bahin Yojana Next installment
मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 जानेवारी 2025 पर्यंत 1.10 कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला असून, 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे.
तुम्हाला योजनेचे पैसे आले की नाही असे तपासा :
- तुम्ही ऑनलाइन बँकिंग किंवा बँक अॅप्लिकेशन च्या माध्यमातून अकाऊंट स्टेटमेंट डाउनलोड करून तपासू शकता.
- तुमच्या बँक खात्यावर याअगोदर योजनेचे पैसे आलेले असतीलच तर त्या खात्याला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल. व तो मेसेज आला का ते तपासा.
- तुम्ही योजनेचे पैसे आले की नाही पाहण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत जाहूनही तपासू शकता.