Ladki Bahin Yojana Next Installment Date
Ladki Bahin Yojana Next Installment Date :- नमस्कार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत असून राज्य सरकारने या योजनेत बदल केला असून राज्यातील काही लाडक्या बहिणींना यापुढे 500 रुपये महिना च मिळणार आहे, तर यासंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्र राज्याचे माझी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024 पासून सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 2.74 कोटी महिलांना लाभ मिळत असून 1500 रुपये महिना मिळत आहे.
Ladki Bahin Yojana Next Installment Date
पण आता मात्र या योजनेत बदल करण्यात आला असून यापुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांना 500 रुपयेच मिळणार आहेत.
कारण काय ?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील ज्या महिलांना 1500 रुपये मिळत आहे व त्यासोबतच त्या महिलांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपये व केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार संचालित नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपये मिळत असतील तर अश्या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये महिना देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
फक्त 500 रुपयेच का ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना वार्षिक 18000 रुपये देण्यात येत आहे. व यासोबतच पीएम किसान योजनेचे वार्षिक 6000 रुपये व नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 6000 मिळत असतील तर अश्या महिलांना 500 रुपये महिना मिळणार. याच कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत वार्षिक 18000 रुपये व पीएम किसान आणि नमो किसान योजनेचे वार्षिक 12000 हजार मिळते पण याची बेरीज केली तर वार्षिक 30000 रुपये होतात त्यामुळे ज्या महिला वरील तिन्ही योजणांना पात्र असतील तर अश्या महिलांना वार्षिक फक्त 18000 रुपये द्यायचे म्हटल तर लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये (वार्षिक 6000 रुपये) व पीएम किसान, नमो शेतकरी यांचे वार्षिक 12000 रुपये व यांची बेरीज 18000 रुपये होतात त्यामुळे “या लाडक्या बहिणींना” आता 500 रुपये महिना मिळणार आहे.