Crop Loan Waiver | शेतकऱ्यांना दिलासा ; शेती कर्जासंदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
79 / 100

Crop Loan Waiver

Crop Loan Waiver

Crop Loan Waiver :- नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात गेल्या खरीप 2023 या हंगामात पडलेला दुष्काळ बघता राज्य सरकारने दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती कर्जा संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे.

सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ/दुष्काळसदृश्य परिस्तिथी घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यातील 1021 महसुली मंडळामध्ये पीक कर्जाचे Crop Loan Waiver पुनर्रगठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत एक शासन निर्णय घेण्यात आला आहे.

सन 2023 च्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग (मदत व पुनर्रवसण) यांच्यामार्फत राज्यातील 40 तालुकयांमध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुकयांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जगन्याच्या 75% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मी. मी.  पेक्षा कमी झाले आहे.अशा एकूण 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य पररस्थिती घोषित करून
दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

Crop Loan Waiver

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

खरीप  हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक 31 मार्च 2024 असल्याने वरीलप्रमाणे बाधित तालुकयातील जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप 2023 च्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिसर्वे बॅंके च्या दि17.10.2018 रोजीच्या निर्देशानुसार पुनर्रगठन करण्यात यावे.

👉Karjmafi List 2024 Maharashtra | मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! राज्यातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी ; तुमचे कर्जमाफ होणार का ?

तसेच खरीप 2023 हंगामाकरीता दुष्काळ घोषित केल्याचे आदेश दिनांक 10 नोव्हेंबर 2023  पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील ६ महिन्यांच्या कालावधीपर्यन्त लागू राहतील. त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बॅंका, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक ली व संबंधित जिल्हा मध्यवती बॅंकांनी
आवश्यक ती कार्यवाही करावी.

👉GR पाहण्यासाठी इथे क्लिक करा 
👉Paddy bonus maharashtra | राज्य सरकारचा मोठा निर्णय ! या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस मिळणार

Leave a Comment