IMD Alert | राज्यात मुसळधार पाऊस बरसणार ! पुढील 4 दिवस या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर.

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
83 / 100 SEO Score

IMD Alert

IMD Alert

IMD Alert : राज्यात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे तर बहुतांश जिल्ह्यात उष्णतेची लाट आहे. अशातच हवामान खात्याने पुढील 4 दिवसासाठी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसासाठी ऑरेंज, येलो अलर्ट जाहीर करून पुढील 3 ते 4 दिवस संबंधित जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

मित्रहो, काल दिनांक 7 जून रोजी राज्यातील नाशिक, ठाणे अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्याचं पाहायला मिळाल आहे.

IMD Alert

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 8 जून रोजी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांना पावसासाठी येलो अलर्ट देऊन राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर दिनांक 9 जून रोजी राज्यातील विदर्भातिल पूर्ण जिल्हे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून संबंधित ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन इथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

दिनांक 10 जून रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. व सातारा, सांगली या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज दिला आहे.

सोबतच दिनांक 11 जून रोजी पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

👉Nandura Urban Bank Scam Update | मोठी बातमी ! या बँकेत मोठा घोटाळा ; या बँकेत तुमच खातं तर नाही ना ?

Leave a Comment